मुंबई – अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘जर्सी’मुळे चर्चेत आहे. शाहिदसोबत या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याही भूमिका आहेत. शाहिद आपला चित्रपट हिट व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि अलीकडेच त्याने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने लग्नानंतर त्याचे आयुष्य कसे बदलले हे सांगितले आहे. यावेळी अभिनेत्याने अनेक खुलासे सुद्धा केले आहेत.
शाहिदने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या चित्रपटाबद्दल आणि कुटुंबाबद्दल खुलासा केला आहे. पैसे बचत करण्यावरून प्रश्न विचारला असता शाहिद म्हणाला पूर्वी मी माझे सर्व पैसे खर्च करायचो पण आता नाही. मी आता एक कौटुंबिक माणूस आहे, मला मुले आहेत, पत्नी आहे. पैसे खर्च करण्यासाठी आता मला पत्नीची परवानगी घ्यावी लागते. ‘जर्सी अभिनेता म्हणाला, ‘मी माझ्या स्वत: सहलीसाठी तिची परवानगी घेतली नाही, तो माझा हक्क आहे.
शाहिद आणि मीराने 2015 मध्ये लग्न केले आहे. या दोघांना मीशा आणि झैन ही दोन मुले आहेत. 2017 मध्ये या दोघांना मीशा ही मुलगी झाली. जैन यांचा जन्म 2018 मध्ये झाला. वडील होण्याच्या अनुभवावर शाहिद कपूर म्हणाला की, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे. वडील झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप काही बदल झाले असून तो पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार झाला आहे असे शाहिद म्हणाला आहे.