पुणे(प्रतिनिधी) – बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या.विजय बाळू सोनवणे (वय.21,रा. आदर्शनगर उरूळी देवाची ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल व दोन काडतूसे जप्त करण्यात आली आहे.
सोनवणे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचे दोन, जबरी चोरीचे व इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.दरम्यान अहमदरनगर येथील सोनई पोलिस ठाण्यात त्याच्यावर आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल होता. तेव्हा पासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
अहमदरनगर पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार हडपसर पोलिस तपास करत असतना, सहाय्यक निरीक्षक संजय चव्हाण, कर्मचारी नितीन मुंढे,प्रताप गायकवाड यांना सोनवने फुरसूंगी परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपासासाठी सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.