हडपसर – कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन मतदार संघाचे अध्यक्ष संदीप दळवी यांनी केले होते, त्याला परिसरातील भाजप पदाधिकारी व इतरही अनेक नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
सुमारे दोन टेम्पो जमा झालेली मदत ही चिपळूण याठिकाणी जाऊन वाटप करण्यात आली. दरम्यान नगरसेविका रंजना टिळेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून हे मदतीचे टेम्पो चिपळूणकडे रवाना केले होते.
भाजपा हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदिप दळवी, शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, गणेश घुले, सुनील कामठे, अविनाश मगर, सत्यवान घुले, प्रमोद सातव, आकाश डांगमाळी, सुनील धुमाळ, मधुकर कदम आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पदाधिकार्यांनी चिपळूण येथील पेठमाप परीट आळी, पेठमाप साईनाथ आळी, कोलंबस्टे ,वाशीस्टि नगर, खेर्डी टेरव रोड विकासवाडी याभागत घरोघरी जाऊन किराणा साहित्य, पाघरून, रोजच्या वापरासाठीची भांडी व काही प्रमाणात कपडे यावेळी मदत म्हणून देण्यात आली.