हडपसर पोलिसांची कारवाई…
पुणे (प्रतिनिधी) – दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन दुचाकी , कुकरी, बॅग, कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, कटर, मिरची पुड, दोरी असा 81 हजारांचे साहित्य हस्तगत करण्यात आले. ही कारवाई हडपसर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस शिपाई नितीन मुंढे व पोलिस नाईक विनोद शिवले यांना मिळालेल्या खबरीवरुन करण्यात आली.
तिलकसिंग गब्बरसिंग टाक( 28,रामटेकडी, हडपसर), आजिनाथ लक्ष्मण गायकवाडा(24) यांना घटनास्थळावरुण ताब्यात घेण्यात आले. त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.
आरोपी बिराजदार झोपडपट्टीजवळील मोकळ्या जागेत घातक शस्त्रे घेऊन दरोड्याच्या तयारीसाठी जमले होते. एका सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यांच्या नियोजनासंदर्भात खबर मिळाल्यावर सापळा रचून त्यांना पकडण्यात आले. यातील अटक आरोपींनी दोन दुचाकी चोरी आणि एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पळून गेलेल्या तीघा साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक हिमायल जोशी, सहायक पोलिस फौजदार युसूफ पठाण, पोलिस हवालदार संपत औचरे, राजेश नवले, पोलिस नाईक प्रताप गायकवाड, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे, शाहिद शेख, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.