नवी दिल्ली – गुजरातमधील गरबा नृत्य ( Garba ) परकाराला युनेस्कोने ( Unesco List ) पारंपारिक नृत्य म्हणून मान्यता दिली आहे. युनेस्कोने एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. गरबा हे नृत्य म्हणजे संस्कृतीचा अमूर्त वारसा असल्याचे युनेस्कोने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
संस्कृतिक वारसा असलेल्या कलाकृतींच्या नवीन यादीमध्ये गुजरातमधील गरबा ( Gujrat Garba ) नृत्य प्रकाराचा समावेश करण्यात येतो आहे. भारताचे अभिनंदन, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. बोत्सवानामधील कसने प्रांतात क्रेस्टा मोवाना रिसॉर्ट ( Mewana Resort ) येथे सुरू असलेल्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या सुरक्षेसाठी आंतरसरकारी समितीच्या १८ व्या सत्रात हा निर्णय घेण्यात आला.दिनांक ४ डिसेंबरपासून सुरू झालेली ही बैठक ९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, असेही युनेस्कोने म्हटले आहे.
जरी देशभरात गरबा नृत्यप्रकार केला जात असला, तरी प्रामुख्याने गुजरातमध्ये गरबा नृत्य विशेष लोकप्रिय आहे. नवरात्रीच्या सुमारास देवीच्या उत्सवादरम्यान हा नृत्यप्रकार सादर केला जातो. त्यामुळे या नृत्याला सांस्कृतिक आणि धार्मिक आधार देखील आहे.
तेलाच्या दिव्याने पेटवलेल्या पणत्या, तृणधान्य पेरलेले घट अथवा मातीच्या भांड्याभोवती किंवा देवीच्या प्रतिमेभोवती हे नृत्य घडते. नृत्यकलाकार सुरुवातीला संथ गतीने गोलाकार रिंगणांत हे नृत्य सुरू करतात. नंतर वाद्यांचा गजर वाढत जाताना नृत्य कलाकारांचा नृत्याचा वेगही हळूहळू वाढत जातो. या नृत्यामध्ये स्थानिक लोककलाकारांबरोबर सामाजिक घटक, आणि धार्मिक संघटनांनादेखील आमंत्रित केले जाते. सराव, कामगिरी, अनुकरण आणि निरीक्षणाद्वारे गरबा शहरी आणि ग्रामीण भागात पिढ्यानपिढ्या केला जातो, असेही युनेस्कोने म्हटले आहे.
🔴 BREAKING
New inscription on the #IntangibleHeritage List: Garba of Gujarat, #India 🇮🇳.
Congratulations!https://t.co/c2HMPpStCA #LivingHeritage pic.twitter.com/YcupgYLFjg
— UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳 (@UNESCO) December 6, 2023
बांगलादेशातील रिक्षा रंगरंगोटीचीही युनेस्कोकडून दखल
गरब्याव्यतिरिक्त बांगलादेशातील ढाका येथील रिक्षांवर केल्या जाणार् या रंगरेगोटीचीही युनेस्कोने दखल घेतली आहे. याशिवाय इंडोनेशियामधील जामू वेलनेस संस्कृती, थायलंडमधील नवीन वर्षानिमित्त साजरा होणारा सोंगक्रान उत्सव देखील युनेस्कोच्या नवीन यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. जानेवारी २०२२ पर्यंत भारतातील एकूण १४ कलाकृती आणि सांस्कृतिक कालाविष्कारांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाला आहे.