मुंबई – कर्णधार हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत 156 धावा केल्या असून कोलकात्यासमोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधार हार्दिकने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. याशिवाय साहाने 25 आणि मिलरने 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
आंद्रे रसेलने शेवटच्या षटकात चार बळी घेतले. त्यांनी प्रथम अभिनव मनोहर नंतर लोकी फर्ग्युसन, राहुल तेवतिया आणि यश दयाल यांना बाद केले. गुजरातच्या संघाला शेवटच्या षटकात केवळ पाच धावा करता आल्या. या षटकात रसेलना दोनदा हॅट्ट्रिकची संधी मिळाली, पण त्याची हॅट्ट्रिक पूर्ण झाली नाही. आता पुढील सामन्यात रसेल पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन हॅटट्रिक पूर्ण करू शकतो.
अखेरच्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या आंद्रे रसेलने तब्बल 4 विकेट्स घेतले. याशिवाय टीम साऊदीने 3 तर उमेश यादव आणि शिवम मावीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातची पहिली विकेट लवकर पडली. यानंतर हार्दिक आणि साहाने अर्धशतकीय भागीदारी रचत संघाला सावरले. त्यानंतर पंड्याने डेव्हिड मिलर सह अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये गुजरात संघाला फार काही करता आले नाही आणि गुजरातला 20 षटकांत 156 चं धावा करत्या आल्या.