लंडन- जेव्हा एखाद्या समुदायामध्ये बरेच लोक रोगाचा प्रसार रोखू लागतात तेव्हा रोगाचा प्रतिकार होऊ शकतो. किती लोकांना कोविड-19 चे संक्रमण झाले त्या आधारे ही समूह प्रतिकार शक्ती पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी आहे, असे एका नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे.
एखाद्या व्यक्तीमध्ये नैसर्गिकपणे आणि लोकांमध्ये औषधांच्या सेवनामुळे रोगाच्या विरोधातील प्रतिकारक्षमता उत्पन्न होते, तेंव्हा त्याला समूह प्रतिकारशक्ती असे म्हटले जाऊ शकते, असे यूकेच्या नॉटिंघॅम विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
जेंव्हा खूप मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव झालेला असतो, तेंव्हा ही व्यापक समूह प्रतिकार क्षमता समुदायामध्ये उत्पन्न होते आणि रोगाचा फैलाव रोखला जातो. संसर्गाची साखळी तोडली जाऊ शकते, असे या संशोधकांनी म्हटले आहे. जर्नल सायन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासासाठी संशोधकांनी लोकांचे वय आणि सामाजिक संलग्नतेच्या प्रमाणाच्या आधारे गणितीय मॉडेलची रचना केली. त्या मॉडेलच्या आधारे कोणामध्ये ही प्रतिकारक्षमता निर्माण होते आणि सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. या मॉडेलमधील वय आणि सामजिक सक्रियतेच्या अनुषंगाने या सामूहिक प्रतिकारक्षमतेची मर्यादाही ओळखली जाऊ शकते.
या मॉडेलमधील वय आणि सामाजिक सक्रियतेत भिन्नता आढळल्यावर या सामूहिक प्रतिकारक्षमतेचे प्रमाण 60 टक्क्यांवरून 43 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे संशोधकांना समजले. कोविड-19 बाबत सामूहिक प्रतिकारक्षमतेचे प्रमाण नेहमी 60 टक्के असते. इतक्या प्रमाणातील लोकसंख्येला साथीची लागण होऊ नये यासाठी आगोदरच प्रतिकार औषधे दिलेली असावीत. मात्र लोकांना समप्रमाणात औषध दिलेले असल्यासच ही प्रतिकारक्षमता दिसते. मात्र कोविडसंदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना संसर्ग झाल्याने ही समूह प्रतिकारक्षमता वाढलेली नाही, असे संशोधकांचे मत आहे.