जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद्यांविरूद्ध मोठी कारवाई

सहा दहशतवाद्यांची ईडीकडून संपत्ती जप्त

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद्यांविरूद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यात असणाऱ्या सहा दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त केली आहे.

पाकिस्तानी दहशतवादी प्रमुख आणि जागतिक स्तरावर बंदी घातलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याच्यासह सहा दहशतवाद्यांच्या मालमत्तांचा ताबा तपास यंत्रणेने घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. ईडीने यावर्षी मार्चमध्ये मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) अशा 13 मालमत्ता जप्त केल्या आहेत. ही संपत्ती अनंतनाग, बांदीपोरा आणि बारामुल्ला या तीन जिल्ह्यातून जप्त करण्यात आली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी मोहम्मद शफी शहा, तालिब लाली, गाझी नबी खान, जफर हुसेन भट, अब्दुल मजीद सोफी, नजीर, अहमद दार आणि मंजूर अहमद दार यांच्या नावावर या संपत्तींची नावे आहेत. दहशतवादी कारवायांसाठी तेरा मालमत्ता असून यातील सहा जणांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून उरलेल्या आणखी काही जणांची मालमत्ता लवकरच जप्त करण्यात येणार असल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे. तेरा मालमत्तांचे एकूण मूल्य 1.22 कोटी रुपये आहे आणि ज्यांनी ते ठेवले होते त्यांनी दहशतवादी संघटनेसाठी काम केल्याचा त्यांच्यावर आरोप केला होता.

यूएपीए आणि आयपीसीच्या संबंधित कलमांखाली दाखल केलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एनआयए) दोषारोपपत्राची दखल घेत या प्रकरणात फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने या प्रकरणात सलाउद्दीन, शहा आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा फौजदारी गुन्हा दाखल केला होता. यानंतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)