#INDvBAN 2nd Test : नाणेफेक जिंकून बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय

कोलकाता – ईडन गार्डन या देशातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर आजपासून गुलाबी पर्व अवतरणार आहे. या सामन्यासाठी हे मैदान नववधूसारखे नटलेले आहे. संपूर्ण शहराला गुलाबी छटा आली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून दोन कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू होत आहे. सामन्यातील पहिल्या चेंडूपासून भारतीय क्रिकेटच्या गुलाबी पर्वाची सुरुवात होत आहे.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला असून कर्णधार मोमिनूल हकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारताचा हा 540 वा कसोटी सामना ठरणार आहे. इंदोर येथील पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 130 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.