निघोज, (वार्ताहर) – सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांनी जिल्हा मराठा संस्थेला गावच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देऊन मुलिका देवी विद्यालय व महाविद्यालयाला मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले असून शैक्षणिक संस्कृतीसाठी वराळ पाटील यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे गव्हर्निग कौन्सिल सदस्यपदी डॉ. भाऊसाहेब खिलारी यांची निवड झाल्याबद्दल संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन कार्यालयात संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्य हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त भास्करराव वराळ , मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त बजरंग वराळ, भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अस्लम इनामदार, माजी सरपंच शिवा पवार,योगेश कवडे, होळकर, भाजपचे सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष विलासराव हारदे, अंबर वराळ, शंकर वराळ, तलाठी सुनील उचाळे, भाऊसाहेब वराळ, बाबासाहेब वराळ, ओंकार दुणगले, श्रीकांत पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.