लंडन – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अशेस कसोटी मालिकेतील पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट मंडळात सुरु झालेले राजीनामा सत्र अद्याप सुरुच असल्याचे दिसून येत आहे. क्रिकेट संचालक ऍश्ले जाइल्स, प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांच्या पाठोपाठ आता सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांनीही आपले पद सोडले आहे.
यंदाच्या अशेस कसोटी मालिकेत इंग्लंड संघाला 4-0 असा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर इंग्लंड संघाच्या खेळाडूंसह कर्णधार, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ तसेच त्यांच्या निवड समितीवरही सातत्याने टीका सुरू आहे. याच सगळ्याची नैतिक जबाबदारी घेत या व्यक्तींनी आपले पद सोडले आहे.