सासवड – लॉकडाऊन व संचारबंदीमुळे पुरंदर तालुक्यातील पोलीस प्रशासनावर कामाचा ताण आलेला आहे. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो हे ओळखून भारतीय पत्रकार संघ पुरंदरच्या वतीने आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांना गुडदाणी व चिक्कीचे वाटप करण्यात आले.
यावेळी जगताप यांनी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तहसीलदार रूपाली सरनौबत, सासवडचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माने, पुरंदर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सिंकदर नदाफ, उपाध्यक्ष रमेश लेंडे, सचिव एन. आर. जगताप, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.