वॉशिंग्टन – जगातील ज्या देशांनी अमेरिकेच्या नागरीकांना मायदेशी पाठवण्यास नकार दिला किंवा चालढकल केली त्या देशांवर व्हीसा निर्बंध लागू करण्याचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा आदेश अमेरिकन सरकारने आज जारी केला आहे.
हे व्हीसा निर्बंध 31 डिसेंबर पर्यंत लागू असणार आहेत. अमेरिकेच्या नागरीकांना मायदेशी जाण्यास मज्जाव करणाऱ्या या देशांनी अमेरिकन नागरीकांचे आरोग्य आणि जीवच धोक्यात घातल्याने त्यांच्यावर ही कारवाई करणे भाग पडत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकतेही अनेक देशांचे नागरीक राहात आहेत. त्यांच्यापैकी ज्यांनी अमेरिकेतील कायद्यांचा भंग केला आहे किंवा ज्यांच्यापासून अमेरिकन नागरीकांना करोनाचा धोका आहे त्यांनाहीं त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. पण अनेक देशांनी या नागरीकांना आपल्या देशात परत घेण्यासही चालढकल चालवली आहे त्यामुळे अशा देशांवरही व्हिसा निर्बंध लागू केले जाणार आहेत.