मुंबई – बड्या स्टार्सच्या पत्नी अनेकदा सिनेसृष्टीपासून लांब राहणं पसंद करतात. मीडियामध्ये येण्याऐवजी सोशल मीडियावरून पोस्ट करत राहण्याला ठराविक स्टार्सच्या पत्नी पसंती देतात. यातीलच एक नाव म्हणजे सुनीता आहुजा. पती गोविंदा मोठा स्टार असूनही सुनीता सहसा मीडिया फुटेज घेण्यामध्ये इंट्रेस्ट घेताना दिसत नाही. नुकतीच सुनीता उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. मात्र यावरूनच नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर सुनावले आहे.
गोविंदाची पत्नी सुनीता नुकतीच महाकाल मंदिरात पोहोचली होती. यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामुळे ती ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आली आहे. यादरम्यान सुनीता महाकाल मंदिराच्या गर्भगृहात एक हँडबॅग घेऊन गेली होती, तर या मंदिरात पर्स किंवा पिशवी वगैरे नेण्यास सक्त मनाई आहे. अशा परिस्थितीत सुनीतसोबत मंदिरात असलेली बॅग पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. यावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे.
View this post on Instagram
यावेळी सुनीताने विधिवत महाकालचे दर्शन घेतले. यासह तेथे असलेल्या पुजाऱ्यांशी तिने संवाद देखील साधल्याचे समजते. एरवी स्टायलीशी ड्रेसमध्ये वावरणारी सुनीता यावेळी मात्र पारंपरिक आणि साधा पोशाखात दिसली. मात्र तिने सोबत आणलेली बॅग नेटकऱ्यांना चांगलीच खटकली आहे.
मंदिरात पर्स आणि बॅग घेऊन जाण्यास मनाई असताना सुनीता बॅग घेऊन आत कशी गेली, असा प्रश्न नेटकरी विचारताना दिसत आहे. तर अनेकांनी सेलेब्रेटींना हे थेट परवानगी देत असल्याचे देखील म्हंटले आहे.