मुंबई – अभिनेता गोविंदा खास कॉमेडी आणि आपल्या ब्रेक डान्ससाठी ओळखला जातो.गोविंदा मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी तो रिऍलिटी शोजमध्ये जज म्हणून झळकताना दिसतो. आजही प्रेक्षक गोविंदाच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलचे दिवाने आहेत. नुकतंच गँविंदाने इंडियन आयडलच्या मंचावर आपल्या परिवारासह हजेरी लावली. यावेळी पहिल्यांदाच गोविंदाने आपल्या मुलासोबत स्टेज शेअर केले.
इंडियन आयडलच्या १३ व्या सिजनच्या एका भागामध्ये गोविंदाचा मुलगा यशवर्धनने हजेरी लावली. यावेळी इतर स्टारसोबत धर्मेंद्र देखील उपस्थित होते. फक्त एंट्री घेऊनच यशवर्धन थांबला नाही तर त्याने गोविंदासोबत स्टेजवर डान्स देखील केला. प्रेक्षकांना दोघांची केमेस्ट्री यावेळी चांगलीच आवडली. यशवर्धनला आपल्या पित्याप्रमाणे डान्स करताना पाहून यावेळी सर्वजण आश्चर्य चकित झाले.
Indian Idol 13 ke manch par pehli baar, aa rahe hai Yash. Aur toh aur, Govinda ke saath dance kar ke kiya ek special father-son moment create!
Dekhna na bhuleyega Indian Idol 13 ke #HeroesNo1Special mein, Shanivaar-Ravivaar raat 8 baje, sirf #SonyEntertainmentTelevision par! pic.twitter.com/pzvl0Z6qly— sonytv (@SonyTV) November 18, 2022
या भागादरम्यान गोविंदाची पत्नी देखील उपस्थित होती. बाप लेकाला गोरिया चुराना मेरा जिया या गाण्यावर डान्स करताना पाहून धर्मेंद्रसह अनेकांनी टाळ्या वाजवल्या. शोष मीडियावर मात्र आता यशवर्धन लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. .