सरकारी बॅंक कर्मचारी आजपासून संपावर

व्यवस्थापनाबरोबरील बोलणी फिसकटली : कामावर परिणाम होणार

पुणे – पगार आणि इतर विषयांवर बॅंक कर्मचारी संघटना आणि बॅंक व्यवस्थापनादरम्यानची बोलणी आजही फिसकटल्यामुळे पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सरकारी बॅंकांचे कर्मचारी शुक्रवारपासून (31 जानेवारी व 1 फेब्रवारी) दोन दिवसांचा संप करणार आहेत.

स्टेट बॅंकेसह अनेक बॅंकांच्या व्यवस्थापनांनी कामकाजावर परिणाम होणार असल्याचे सांगितले आहे. 30 महिन्यांपासून वाटाघाटी चालू असूनही त्यावर सर्वमान्य तोडगा निघत नाही. म्हणून बॅंक कर्मचारी संसदेचे अधिवेशन चालू होणार असतानाच 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी संप करणार आहेत. अर्थसंकल्पातही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास 11 मार्चपासून तीन दिवसांचा संप केला जाणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यानंतर 1 एप्रिलपासून बेमुदत संप करण्याचा इशारा बॅंक कर्मचारी संघटनांनी दिला आहे. याचा थेट परिणाम दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे.

भारतीय बॅंक संघ म्हणजे आयबीए आणि बॅंकांच्या नऊ संघटनांचा मंच असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन म्हणजे युएफबीयु दरम्यान झालेली बैठक अयशस्वी झाली. दर पाच वर्षांनी वेतनाचा फेरआढावा घेतला जातो. मात्र, नोव्हेंबर 2017 पासून चर्चा अयशस्वी झाल्यामुळे फेरआढावा अंमलात येऊ शकलेला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.