जिल्हा परिषदेचा प्लॅस्टिकमुक्‍त शाळा उपक्रम

नगर – पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या प्लॅस्टिकला हद्यपार करण्यासाठी नगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात प्लॅस्टिकमुक्‍त शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला आहे. या उपक्रमात नेवासे शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्लॅस्टिकमुक्‍त बनली आहे.

या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा परिसर, गावातील प्लॅस्टिक कचरा,तसेच स्वतःच्या घराच्या परिसरात जमा होणारा प्लॅस्टिक कचरा गोळा करून यापासून वाचनकट्टा, झाडांना आळे तयार केले आहेत. अशा पध्दतीने या प्लॅस्टिकचा उपयोग करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या शाळेला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी प्लॅस्टिकमुक्‍त शाळा उपक्रम राबवण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार या शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

वेळापत्रक तयार करण्यात आले. प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी शाळेचा परिसर, गावाचा परिसर तसेच घराचा परिसर असे तीन ठिकाणे निश्‍चित करण्यात आले. गावामध्ये स्वच्छताफे री काढण्यात आली. या तीन ठिकाणी जमा होणारे प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. असे विविध उपक्रम या शाळेने राबविले आहेत. शिक्षकांनीही कापडी व कागदाच्या पिशव्या तयार करून गावांत त्याचे वितरण करत आहेत. यामुळे नागरिकांमध्येही पर्यावरणविषयक जागृता तयार होत आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.