मंदिरा बेदीने नेहमीप्रमाणे एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिने आपले बेबी बंप दाखवला आहे.
View this post on Instagram
मंदिरा बेदीकडे “गुड न्यूज’ असल्याचे त्यामुळे लोकांच्या लक्षात आले. नाहीतर ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. हा फोटो तिने कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये काढला असावा. “थ्रो बॅक पिक्चर ऑफ माय बेस्ट प्रॉडक्शन’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
तिचा हा फोटो जुनाच असल्याचे थोड्याच वेळात स्पष्ट झाले आहे. हा फोटो 2011 सालचा आहे. तेव्हा ती प्रेग्नंट होती. त्या दिवसांची आठवण आल्यामुळेच मंदिराने हा फोटो शेअर केला आहे. त्यावेळी मंदिराचे केस खूप वाढलेले होते.
View this post on Instagram
अलीकडेच तिने जिममधील व्यायामाचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये ती “वेट ट्रेनिंग’ करत असताना दिसली होती. आणखी एका फोटोमध्ये तिने चक्क सिक्स पॅक्ड ऍबसदेखील दाखवले होते.