Good news : करोनावर प्रभावी ठरणारे औषध झाले लाँच; १० हजार डोसची पहिली बॅच उपलब्ध

नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच करोना प्रतिबंधक लसीकरणही लसीअभावी थंडावले आहे. त्यामुळे स्थिती आणखी बिघडणार अशी स्थिती होती. मात्र आता करोनावर प्रभावी ठरणारं औषध देशात लॉन्च करण्यात आलं आहे. करोना रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

करोनावर प्रभावी ठरणाऱ्या 2 डीजी औषधाचे लाँचिंग संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. 2 डिओक्सि-डी-ग्लुकोज अर्थात 2 डीजी औषध डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी औषधाची पहिली बॅच (10 हजार डोसेस) केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना सुपूर्द केली.

डीफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओच्या अंतर्गत असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडीसिन अँड अलाइड सायन्सेसने करोनावर प्रभावी ठरणारे २ डीजी औषध विकसित केलं आहे. २ डीजी औषधाकडे अँटी कोविड औषध म्हणून पाहिलं जात आहे.

हे औषध विकसित करण्यात डॉ. रेड्डीज लॅबरेटरीज कंपनीने महत्त्वाची भूमिका बाजवली आहे. याच कंपनीकडून २ डीजी कंपनीचे उत्पादन करण्यात येणार आहे. हे औषध पॉवडरच्या स्वरुपात असणार आहे. गेल्या वर्षीपासून या औषधाच्या संशोधन सुरू होतं.

या औषधाच्या तीन ट्रायल झाल्या असून ९ मे रोजी ड्रग कंट्रोलरने औषधाच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली आहे. २ डीजी हे परिवर्तीत रुप आहे. याद्वारे ट्यूमर, कॅन्सर पेशीवरही उपचार होऊ शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.