वाघोली – मराठी चित्रपटांना सध्या राज्य शासनाच्या वतीने चित्रपट गृहे अतिशय अद्ययावत अशी उपलब्ध करून दिली जात असल्याने चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहण्याचा आनंद मराठी बांधव घेत असल्याने चित्रपटांना चांगले दिवस आले असल्याची भावना राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी व्यक्त केली. डार्लिंग या चित्रपटातील कलाकार रितिका श्रोत्री व निखिल चव्हाण यांनी अभिनय केलेला चित्रपट कौतुकास्पद असल्याची भावना देखील सातव पाटील यांनी व्यक्त केली.
मराठी चित्रपटातील कलाकारांनी उत्तम कलाकृती सादर कराव्यात व प्रेक्षकांनी त्याचा मनमुराद आनंद लुटावा यासाठी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा असे आवाहनही सातव पाटील यांनी केले आहे. यावेळी मराठी चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा बदलत असल्याची प्रतिक्रिया कलाकारांनी व्यक्त केली.विनोदी मराठी चित्रपट डार्लिंग चे कलाकार रितिका श्रोत्री व निखिल चव्हाण यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन काळे आदी उपस्थित होते.