पुणे -शालिवाहन शक 1944 किंवा शुभकृत संवत्सर शनिवारी (2 एप्रिल) सुरू होणार आहे. अर्थात हा दिवस हिंदू नववर्षाचा, गुढीपाडव्याचा आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस सोनेखरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यातच गेली दोन वर्षे करोनामुळे अनेकांना सोनेखरेदी करता आली नाही. सध्या करोनाचे सावट बऱ्यापैकी दूर झाल्याने बाजारपेठेत यंदा तेजीचे वातावरण दिसत आहे. साहजिकच सोनेखरेदी 15 ते 20 टक्के अधिक होईल, असा विश्वास नामांकित सराफांनी ‘प्रभात’कडे बोलताना व्यक्त केला आहे.
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. दोन महिन्यांपासून सोन्याच्या दरात सुमारे पाच हजार प्रतितोळा अशी मोठी वाढ झाली असली, तरी या आठवड्याचा विचार करता सोन्याचे दर काही प्रमाणात कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे ऐन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दागिने खरेदीची आयती “सुवर्ण’संधी चालून आली आहे. पाडव्या आधी म्हणजेच आज (शुक्रवारी) सोन्याचा प्रतितोळा दर 47,472 रुपये (22 कॅरेट) इतका होता. तर चांदीचा दर प्रतिकिलो 66,813 रुपये इतका होता.
करोनामुळे मागील दोन वर्षे बाजारपेठ थंड होती; मात्र यंदा सोनखरेदीला उत्साह दिसून येत आहे. प्रथमेश ज्वेलर्स राजगुरूनगर आणि नारायणगाव या ठिकाणी आम्ही ग्राहकांसाठी असंख्य अशा डिझाइन्स उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे एकदा आलेला ग्राहक पुन्हा पुन्हा आमच्याकडे खरेदीला येतो. विनम्र सेवा, विश्वास जपल्यामुळेच अल्पावधीतच आमच्या दोन्ही दालनांमध्ये ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आहे.
-प्रथमेश जवळेकर, प्रथमेश ज्वेलर्स राजगुरूनगर/नारायणगाव
अनेक ग्राहक तसेच भगिनी नव्या वर्षांला सोनेखरेदी करतात. त्यासाठी दरमहा ठराविक रक्कम जमा करून पाडव्याच्या मुहूर्तावर हवेतसे दागिने ते बनवून घेतात. ग्राहकांचा विश्वास आणि चोख दागिने देण्याची आमची परंपरा यामुळे प्रत्येक मुहूर्त तसेच गुरुपुष्यामृतला सोने, चांदी खरेदीसाठी हमखास आमच्या दुकानात ग्राहक येत असतात.
-मच्छिंद्र मुंडलिक, श्रीहरी ज्वेलर्स नारायणगाव
सध्या टेम्पल, राजकोट या प्रकारच्या डिझाईनला विशेष मागणी आहे. मागणीनुसार सोन्याचे दागिने पुरवणे ही आमची वडिलोपार्जित परंपरा आहे. याशिवाय ज्या कॅरेटचे सोने त्याच कॅरेटचा भाव आपल्याकडे दिला जात असल्याने ग्राहकांना ते परवडते. विश्वासाची परंपरा जपत असल्याने आमचे पुणे, मुंबईचे अनेक ग्राहकही सोनेखरेदीसाठी अंबिका अलंकारमध्येच येतात.
-सुनील शहाणे, अंबिका अलंकार मंचर
गुढीच्या मुहूर्तावर सोने खरेदी?
आता लग्नाचा सिझन सुरु झालेला आहे आणि त्यामुळे सोन्याला मागणीही बऱ्यापैकी आहे. सोन्यातल्या गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. तीन वर्षापूर्वी सोनं प्रतितोळा 56 हजार 254 वर पोहोचलेलं होतं. तो उच्चांकी भाव होता. त्यानंतर आता तो 52 हजारांकडे आलेला आहे. याचाच अर्थ सोनं तीन वर्षांनंतरही जवळपास 4 हजारांनी स्वस्त आहे. त्यामुळे लग्नाची खरेदीही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यास अनेकांची पसंती असते. किंबहुना ते शुभ मानले जाते.