टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरच सर्व खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ऑलिम्पिक विजेते थेट दिल्लीत त्यांचा क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुजरात: ओलंपिक में गोल्ड मेडल जीतने वाले खिलाड़ी नीरज चोपड़ा के लिए भरुच में एक पेट्रोल पंप के मालिक अयूब पठान नीरज नाम के सभी लोगों को 501 रुपए का पेट्रोल मुफ़्त में दे रहे हैं।
उन्होंने कहा, “अब तक 30 लोगों को मुफ़्त में पेट्रोल दे चुके हैं। यह योजना अगले 2 दिन तक जारी रहेगी।” pic.twitter.com/461SXiQErJ
— ANI_HindiNews (@AHindinews) August 9, 2021
भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ७ पदक पटकावली आहे. त्यात एक सुवर्ण पदकाचा समावेश आहे. सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, नीरज चोप्राच्या या कामगिरीनंतर अनेकांनी त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावर केला. अशातच गुजरातमधील भरूच येथील एका पेट्रोल पंप चालकानं मात्र लोकांना अनोखी भेट दिली.
पेट्रोल पंपाचे मालक अयूब पठाण यांनी नीरज नावाच्या सर्व व्यक्तींना ५०१ रूपयांचं पेट्रोल मोफत देण्याचे ठरवले आहे. त्यांनी आपला आनंद अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोल पंपवर नागरिकांची गर्दीच गर्दी दिसून येत आहे.
दरम्यान, पेट्रोल पंपावर येणाऱ्या नीरज नावाच्या व्यक्तीला आयडी कार्ड दाखवल्यानंतर ते ५०१ रूपयांचं पेट्रोल अगदी मोफत दिले जात आहे. यामध्ये ऐकून ३० जणांना मोफत पेट्रोल देण्यात आले आहे.