नवी दिल्ली – सध्या विविध क्षेत्रात कमी व्याजदर चालू आहेत. त्यामुळे बॅंका सोन्यावर कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करीत आहेत.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंजाब नॅशनल बॅंकेने सोन्यावर जे कर्ज दिले जाते त्या कर्जावरील व्याजदरात 1.45 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. आता या बॅंकेचे सार्वभौम सुवर्ण रोख्यावर आधारित कर्ज 7.20 टक्के दराने मिळेल. सोन्याच्या दागिन्यावरील कर्ज 7.3 टक्के दराने उपलब्ध होणार आहे.
या बॅंकेचे घरासाठीचे कर्ज 6.60 टक्क्यापासून, कारसाठीचे कर्ज 7.15 टक्क्यांपासून, वैयक्तिक कर्ज 8.95 टक्क्यापासून पासून मिळते. उत्सवाच्या काळात मर्यादित कालावधीसाठी बॅंकेमुळे बऱ्याच कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.
उत्सवाच्या काळात कर्जाचा उठाव वाढावा याकरिता स्टेट बॅंकेसह विविध बॅंकांनी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या काळात ग्राहक अधिक कर्ज घेतील अशी अपेक्षा बॅंकांना आहे.