नवी दिल्ली – औद्योगिक परिस्थिती सुधारून शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत असल्यामुळे सोन्यातील बरीच गुंतवणुकाचा शेअर बाजाराकडे वळत आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात घट चालूच आहे. दिल्ली सराफात गुरुवारी सोन्याचा दर 32 रुपयांनी कमी होऊन 52,224 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 348 रुपयांनी कमी होऊन 57,298 रुपये प्रति किलो झाला.
गेल्या आठवड्यामध्ये सोने आणि चांदीच्या दारात बरीच घट झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,763 डॉलर व चांदीचा दर 19.67 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. जागतिक आर्थिक परिस्थिती लवचिक असल्यामुळे सर्वच बाजारात अस्थिरता आहे असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.