Gold-Silver Price Today : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या देशांतर्गत किमतींमध्ये किंचितशी घसरण दिसून आली आहे. सोमवारी सकाळी सोन्याचा भाव १९९ रुपयांनी कमी होऊन ६२,३५८ रुपये प्रति १० ग्रॅम होता. सोन्याबरोबरच चांदीच्या देशांतर्गत किमतींमध्येही घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चांदीचा भाव ३२८ रुपयांनी घसरून ७२,२५९ रुपये प्रति किलो झाला आहे.
जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,३७४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,५९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३७४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५९० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३७४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५९० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३७४आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५९० रुपये आहे.