Gold Rates Today : सोने- चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसतात. यातच आज मंगळवारी ३० जानेवारी रोजी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. याशिवाय चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील किंमती जाणून घ्या.
सोन्याच्या दरात २२० रुपयांची वाढ होऊन ६३ हजार २७० रुपयांपर्यंत किंमत पोहचली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही ३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार चांदी ७६,५०० प्रतिकिलो दराने विकली जात आहे. तर काल चांदी प्रति किलो ७६,२०० रुपये इतकी होती.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,२०९ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,४१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,२०९ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,४१० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,२०९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,४१० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,२०९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,४१० रुपये आहे.