Gold Rates Today – गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज रुपयाच्या मुल्यात बरीच सुधारणा झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट नोंदली गेली.
दिल्ली सराफ सोन्याचे दर 108 रुपयांनी कमी होऊन 48,877 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्ली सराफात तयार चांदीचे दर मात्र 144 रुपयांनी वाढून 65,351 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,857 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 25.48 डॉलर प्रति औंस झाले. रुपयाचे मुल्य सकाळी 10 पैशानी वाढले होते. ( Gold Rates Today )
एचडीएफसी सिक्युरिटीज विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतीक बाजारात जरी सोन्याचे दर वाढले तरी भारतीय रुपया वधारल्यामुळे भारतात सोन्याचे दर कमी झाले. भारत आपल्या गरजेचे सोने आयात करतो.
भारतीय चलन बळकट झाल्यानंतर सोन्याची आयात स्वस्त होते. सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली असल्यास दिर्घ पल्ल्यातील गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदी योग्य ठरू शकते असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. ( Gold Rates Today )