Share Market Today | शेअर बाजारात आज काय घडलं? वाचा सविस्तर…

निर्देशांक स्थिर; महिंद्रा, एअरटेलच्या शेअरची खरेदी

Share Market Today – जागतीक बाजारातून संमिश्र सकेत आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या लाटा आल्या. बाजार बंद होताना निर्देशांक कमी अधिक प्रमाणात कालच्या पातळीवर स्थिर राहीले.
बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 24 अंकांनी म्हणजे 0.05 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 49,492 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी मात्र 1 अंकाने वाढून 14,564 अंकांवर बंद झाला.

रिलायन्स सिक्‍युरिटीजचे विश्‍लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंकेने निर्देशांक आवश्‍यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्याचे म्हटले आहे. त्यातच जागतीक बाजारातून संमिश्र संकेत आल्यानंतर काही गुतवणूकारांनी नफा काढून घेतला तर काही गुंतवणूकदारानी खरेदी केली. त्यामुळे निर्देशांक स्थिर राहीले.

महिंद्रा, स्टेट बॅक, आयटीसी, एनटीपीसी, एअरटेल ओएनजीसी या कंपन्याच्या शेअरची खरेदी झाली. तर बजाज फायनान्स, टायटन, सनफार्मा या कंपन्याच्या शेअरची विक्री झाली. काल सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ किमतीवर आधारीत महागाई कमी झाली आहे. मात्र औद्योगीक उत्पादन वाढताना दिसत नाही.

भारताची अर्थव्यवस्था मजबुत असल्याची लक्षणे दिसत आहेत. त्याचबरोबर कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांना भारत आकर्षक वाटत आहे. त्यामुळे निर्देशांक आगेकूच करतील किंवा स्थिर राहण्याची शक्‍यता विश्‍लेषकांना वाटते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.