मुंबई, दि.6-सध्याच्या जागतिक अनिश्चित परिस्थितीत सोने आणि चांदीचे दरही अस्थिर झाले आहेत. दिली सराफात सोन्याचा दर 29 रुपयांनी वाढून 46,974 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा दर 149 रुपयांनी कमी होऊन 60,137 रुपये प्रति किलो या पातळीवर बंद झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,781 डॉलर व चांदीचा दर 22.38 डॉलर प्रति औंस झाला. ओमायक्रॉनचे जगभरात वाढत असलेले रुग्ण पाहता औद्योगिक आघाडीवर नकारात्मक परिस्थिती होण्याच्या शक्यतेमुळे आगामी काळात सोने आणि चांदीचे दर वाढणार असल्याची भावना बऱ्याच विश्लेषकांनी व्यक्त केली.