नवी दिल्ली – दिल्ली सराफात गुरुवारी सोन्याचा दर 284 रुपयाने कमी होऊन 46,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,292 रुपयांनी कमी होऊन 59,590 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,800 डॉलर व चांदीचा दर 22.34 डॉलर या पातळीवर गेला.
अमेरिकेची रिझर्व बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने लवकर व्याजदर वाढीचे संकेत दिल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळते. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीत घट झाली असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले की, महागाई वाढत असल्यामुळे अमेरिकेचे फेडरल रिझर्व अपेक्षेपेक्षा लवकर व्याजदर वाढ करील असे गृहीत धरले जाऊ लागले आहे.