जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना उद्देशून स्लेजिंग केल्यामुळे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यावर सध्या प्रचंड टीका होत आहे.
दुसरा कसोटी सामना सुरू असताना दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना डीन एल्गरसह अन्य फलंदाजांविरुद्ध स्लेजिंग केले होते. या सामन्यात पंतसह कर्णधार लोकेश राहुल व दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंमध्येही मैदानावरच शाब्दिक चकमक उडाली होती.
एल्गरबाबत पंतने केलेल्या या प्रकारावरून पंतच टीकेचा धनी झाला आहे. आपल्या खेळावर जास्त लक्ष दे, असा खोचक सल्लाही काही चाहत्यांनी पंतला दिला आहे.