मुंबई – भारतामध्ये नागरिकाकडून सोन्याची खरेदी वाढत असून 2021 मध्ये भारताने तब्बल 1,067 टन सोन्याची आयात केली. 2020 मध्ये केवळ 430 टन सोन्याची आयात झाली होती. आता परिस्थिती वेगाने पूर्ववत होत असून या आयात सोन्यापैकी बरेच सोने दागिने निर्यातीसाठी वापरले जाते. त्यामुळे दागिने निर्यातही वाढणार असल्याचे दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने म्हटले आहे.
सरलेल्या वर्षात भारताने स्वित्झर्लंड, सौदी अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका या देशातून जास्त प्रमाणात सोन्याची आयात केली. सध्या भारत दर महिन्याला साधारणपणे 46 टन सोन्याची आयात करतो. म्हणजे करोनापूर्व पातळीवर ही सोन्याची आयात गेली आहे.
सोन्यावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आणि जीएसटी लागू केला जातो. त्यामुळे देशातील दागिने उद्योगरवर परिणाम होत आहे. या उद्योगांमधून निर्यात वाढावी, त्याचबरोबर रोजगार निर्माण व्हावा याकरिता कर कमी करण्याची गरज असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.