नवी दिल्ली,- करोना व्हायरसमुळे जगातील विविध बाजारातील परिस्थिती कमालीची अनिश्चित झाली आहे. त्यामुळे शेअर बाजार, चलन बाजार आणि धातु बाजारावर परिणाम होत आहे. सोन्याच्या किमती जागतिक पातळीवर बऱ्याच अस्थिर आहेत.
गुरुवारी सोन्याचे दर काही प्रमाणात वाढले. मात्र चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली. गुरुवारी सोन्याचा दर दिल्ली सराफात 168 रुपयांनी वाढून 47,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा दर 238 रुपयांनी वाढून 69,170 रुपये या प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,791 डॉलर तर चांदीचा दर 26.45 डॉलर प्रति औंस झाला. या घटनाक्रमाबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक वायदे बाजारात सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्यानंतर स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे दर कमी होऊ लागले आहेत. मात्र एकूण परिस्थिती पाहता आगामी काही काळ तरी सोने आणि चांदीचे दर अस्थीर राहण्याची शक्यता आहे.