Gold Silver Price Today आज शुक्रवारी देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत दिलासा मिळाला आहे, सोन्याच्या किंमतीत मोठी वृद्धी झाली नाही, जर तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल. या आठवड्यात सर्वसामान्य ग्राहकांना सोने-चांदीने दिलासा दिला. किंमतीत मोठी वृद्धी झाली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मौल्यवान धातूत दरवाढीचे सत्र सुरु होते. सोने-चांदीने दोन आठवड्यापूर्वी अनेक रेकॉर्ड मोडीत काढले.
तर जाणून घ्या सोन्या-चांदीच्या भाव
सराफा बाजारात आज सोन्याचे भाव स्थिर राहिले आहेत. लग्नसराईच्या काळात २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,१५० प्रति ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ५७,९०० रुपये प्रति ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. तर चांदीची किंमत ७०० रुपयांनी वाढून ७९,२०० प्रति किलो एवढी वाढली आहे. दुसरीकडे, दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. उल्लेखनीय म्हणजे सोन्याच्या किमतीत घट झाली असली तरीही सोने अजूनही ६३,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. यापूर्वी चांदी 3500 रुपयांनी महागली. 18 डिसेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 21 डिसेंबर रोजी चांदीत 700 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,200 रुपये आहे.