Gold Price Today: शुक्रवारी (6 ऑक्टोबर 2023) भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव 57,400 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 70,900 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 50 रुपयांनी वाढून 57,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 57,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदीचा भाव 400 रुपयांनी घसरून 70,900 रुपये प्रति किलो झाला आहे.
परदेशी बाजारात सोन्याचे भाव वाढले –
परदेशी बाजारात सोने प्रति औंस US $ 1,822 च्या वाढीसह व्यवहार करत होते, तर चांदी US$ 20.95 प्रति औंसच्या घसरणीसह व्यवहार करत होती.