मुंबई – बॉलिवूडचा गली बॉय म्हणून ओळख असलेला अभिनेता “रणवीर सिंह’ याने अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. गली बॉय, सिंबा, बाजीराव मस्तानी, पद्मावती, राम-लीला, बेफिक्रे, बँड बाजा बारात अशा अनेक चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे.
अनेक पुरस्कारांनी रणवीर सिंहला गौरवण्यात सुद्धा आले आहे. अतिशय मेहनती, उत्तम अभिनेता आणि मनमिळावू स्वभावामुळे देशभरात रणवीरचे हजारो चाहते आहेत.
रणवीर सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड ऍक्टिव्ह असतो. तो नेहमीच आपल्या आगामी प्रोजेक्ट बद्दल चाहत्यांशी सवांद साधतो. तसेच स्वतःचे काही व्हिडिओ आणि फोटो देखील इंस्टाग्रामवर शेअर करतो.
नुकतंच रणवीरने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून यामध्ये त्याचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. सध्या त्याचे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल होत असून, यावर मीम्सचा पाऊसच पडला आहे.
एका फॅशन ब्रँडच्या फोटोशूटसाठी रणवीरनं हा वेश धारण केला होता. यामध्ये रणवीरने स्काय ब्लू कलरचा ट्रॅकसूट परिधान केलाय आणि काळ्या रंगाचा लेदर हँडबॅग कॅरी केलेला दिसत आहे. रणवीरचे हे सर्व फोटो त्याच्या बाकी फोटोंपेक्षा खूप वेगळी आहेत.