नवी दिल्ली – दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याच्या दरात 251 रुपयांची घट होऊन सोन्याचा दर 51,035 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दिल्ली सराफात चांदीचा दरही 1,080 रुपयांनी कोसळून 62,435 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
व्याजदरात वाढ आणि इतर कारणामुळे जागतिक बाजारात मात्र सोन्याचा दर वाढून 1,878 डॉलर व चांदीचा दर 22.39 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत असले तरी भारतीय बाजारात मागणी कमी असल्यामुळे सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली. असे असले तरी आगामी काळात सोन्याचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.