नवी दिल्ली – जागतिक धातू बाजारात असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सराफात सोमवारी सोन्याच्या दरात अल्प घट झाली. सोन्याचा तर केवळ 5 रुपयांनी कमी होऊन 47,507 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 27 रुपयाने कमी होऊन 60,914 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सकाळच्या सत्रात रुपयाचा दर 45 पैशांनी वाढला. याचाही सोन्याच्या दरावर परिणाम झाला असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,788 डॉलर व चांदीचा दर 22.42 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. फेडरल रिझर्व्हच्या कडक पतधोरणामुळे सोन्याचे दर सध्या कमी पातळीवर असल्याचे दिसून येते.