Gold and Silver Price Today : आज देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत बदल दिसून येतोय. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. जागतीक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारातही शुक्रवारी सोन्याच्या दरात भरीव वाढ नोंदली.
सोन्या – चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,५२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,३७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,२०० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,४०० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,२०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,४०० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,२०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,४०० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,२०० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,४०० रुपये आहे.