पणजी : देशात एकीकडे कोरोनाचे थैमान कमी होण्याचे नाव घेत नाही. तर दुसरीकडे एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गोव्यातील कोरोना विषाणूबाधित सर्व रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचे एकूण सात प्रकरणे समोर आली होती. यातील सहा यापूर्वीच बरे झाले होते. अखेरच्या रुग्णाचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
#WATCH: I am delighted to announce that currently there is not a single #COVID19 positive patient…I appeal to the people of Goa to extend their cooperation to us till 3rd May, just like they have done till date: Goa Chief Minister Pramod Sawant pic.twitter.com/7Jef4RHJcV
— ANI (@ANI) April 19, 2020
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टि्वट करून याविषयी माहिती दिली. आनंददायक आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे अखेरच्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. डॉक्टर आणि सहायक कर्मचारी यासाठी कौतुकास पात्र आहेत. गोव्यात ३ एप्रिलनंतर एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.
गोव्यात कोरोना विषाणूची सुरुवात १८ मार्चला झाली होती. दुबईवरुन परतलेल्या एका राजकीय नेत्याला याची सर्वांत आधी लागण झाली होती. दि. ३ एप्रिलपर्यंत येथे ७ रुग्ण सापडले होते. त्यानंतर राज्यात नवीन प्रकरण सापडले नाही. १५ एप्रिलपर्यंत राज्यात ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले होते. शेवटच्या रुग्णाचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आला. गोवा देशातील सर्वांत पहिले ग्रीन झोन राज्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.