मुंबई – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते . अभिनय विश्वातून पद्मश्री पुरस्कारासाठी रविनाची निवड करण्यात आली होती. सोशल मीडियावर अनेकांनी रवीनला पद्मश्री का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने देखील रवीनाला दिलेल्या पुरस्काराबाबत ट्विट केले आहे.
अभिनयापेक्षा चित्रपटांचे समीक्षण करून चर्चेत राहणार कमल आर खान उर्फ केआरकेने अभिनेत्री रविना टंडनला देण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्काराबाबत भाष्य केले आहे. रवीनाने “तू चीज है बडी मस्त मस्त” सारखी गाणी केली आहेत आणि तिला पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पद्म पुरस्काराचा अपमान नाही का ?” असा सवाल केआरकेने उपस्थित केला आहे.
केआरके आधी अनेक नेटकऱ्यांनी याबाबत सोशल मीडियावर देखील हाच सवाल उपस्थित केला होता. कमल आर खानने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.