“भुलभुलैया 2’मध्ये भुताटकीची कथा

कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी मिळून “भुलभुलैया’च्या सिक्‍वेलचे प्रमोशन करत आहेत. “भुलभुलैया 2′ जरी सिक्‍वेल असला तरी पहिल्या भागामधील कथेशी याचे काहीही साधर्म्य असणार नाही, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.पहिल्या भागात अक्षय कुमार आणि विद्या बालन प्रमुख भुमिकेत होते.

त्यात भुताचा आभास निर्माण झाला होता पण प्रत्यक्ष्यात तो एक सायकोलॉजिकल थ्रिलर होता. मात्र दुसऱ्या भागात खरोखरच भुताटकीची कथा असणार आहे. पहिला “भुलभुलैया’ जिथे समाप्त होतो, तिथून हा दुसरा भाग सुरू होणार नाही. केवळ पहिल्या भागाला मिळालेली लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी या दुसऱ्या भागाला पहिल्या भागाशी नावाने जोडले आहे.

प्ण त्यात भ्यूताची गोष्ट असेल हे नक्की. या दुसऱ्या भागात अक्षय कुमार विशेष रोलमध्ये दिसेल, असे म्हटले जात होते. मात्र डायरेटर अनिस बज्मीए ही शक्‍यता फेटाळली. अक्षय कुमार या सिनेमातच असणार नाही, हे अनिस बज्मीने स्पष्ट केले. कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी हे या सिनेमाचे लीड ऍक्‍टर असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.