घनश्‍याम हाके यांना वयोवृद्धांचा आशीर्वाद 

हडपसर – वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्‍याम बापू हाके यांच्या प्रचाराला मतदारांनी आज शिंदे वस्तीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हडपसर मतदारसंघातील जनतेला सुविधा देण्याचे आणि विविध प्रश्‍नांना शासनदरबारी वाचा फोडण्याचे प्रामाणिक काम आपण आमदार होताच नक्कीच करू, अशी ग्वाही देत हाके यांनी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. चौकाचौकात आणि घरोघरी घनश्‍याम हाके यांचे औक्षण केले जात होते.

यावेळी हाके यांनी ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रचार दौऱ्यात अतिश आलटे, बाळू हजारे, धर्मराज लांडगे, आप्पा घोडके, अभिजीत टेकाळे, कुमार चक्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तर, प्रचारादरम्यान माता-भगिनी औक्षण करून स्वागत करीत आहेत. वयोवृद्ध आशीर्वाद देत आहेत. या प्रेमाने मी भारावून गेलो आहे अशी भावना घनश्‍याम बापू हाके यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.