झाकीर नाईकच्या भाषणामुळे 127 तरुणांचा इसिसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या 127 तरुणांकडून मिळालेली माहिती धक्कादायक स्वरुपाची आहे. वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांमुळे प्रभावित झाल्याचे या तरुणांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या भाषणामुळेच आपण इसिसच्या संपर्कात आल्याचे या तरुणांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) संचालक वाय.सी.मोदी यांनी दहशतवादविरोधी पथकांच्या एका परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. या परिषदेमध्ये देशातील महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणा, पोलिस यंत्रणांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना मोदी यांनी देशापुढील दहशतवादाच्या आव्हानांचा आढावा घेतला. बांगलादेशस्थित दहशतवादी संघटना जमात उल मुजाहिदीनने आपले पाय महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकमध्ये पसरल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.