रेरा प्रॅक्टीशनर्स असोसिएशनकडून पुणे भेटीवर आलेल्या रेरा अध्यक्षांचे स्वागत
पुणे : महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी सुनावणीसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष ऍड. नीलेश बोराटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले. त्यावेळी ऍड. सुरभी मेहता यांनी रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कार्याबाबत माहिती दिली.
यावेळी चटर्जी यांनी वकिलांसोबत संवाद साधला. रेरा कायद्याबाबतची जागृतीपर जास्तीत जास्त माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी घर खरेदी करण्यापूर्वी महारेराच्या संकेतस्थळाला भेट देऊनगृह प्रकल्पाबाबत पूर्ण माहिती घ्यावी.
मगच घर खरेदी करावे सल्ला त्यांनी दिला. रेरा कायदा अस्तित्वात आल्यानंतर देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक बांधकाम प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुणे आणि मुंबई शहरातून जास्त नोंदणी झाल्या आहेत. प्रकल्पांची नोंदणी केल्यानंतर कायद्याअंतर्गत प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने नोंदणीकृत असलेल्या प्रकल्पांची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर देणे बधनकारक आहे.
त्याच वेळी नोंदणीकृत असलेल्या प्रकल्पाबाबत वास्तुविशारद यांचे बांधकाम पूर्णत्वाचे दाखले, सनदी लेखपाल, अभियंता यांचे आवश्यक असणारे दाखले, नोंदणी कृतप्रकल्पांची मुदत वाढवून घेणे अश्या अनेक बाबींची माहिती संकेतस्थळावर द्यायची असते. ही माहिती ज्या बांधकाम व्यावसायिकांनी संकेतस्थळावर दिली नाही, त्यांच्या सुनावणीसाठी ते पुण्यात आले होते.
यावेळी ऍड. अमित पाटील, ऍड. चिंतामणी माने देशमुख, ऍड. ज्योती असणेकर, ऍड. स्मिता तन्ना, ऍड. मकरंद पराडकर, ऍड. वर्षा जोशी, ऍड. सुजाता भावे, ऍड. प्रवीण टिळेकर, ऍड. शिल्पा प्रताप, ऍड. निषाद कुलकर्णी, ऍड. विक्रम पाटील, ऍड. रणजित पाटील, ऍड. विवेक घोलप, ऍड. भूषण पवार, ऍड. संतोष रणदिवे, ऍड. संतोष फळफळे, ऍड. हर्षल जाधव, ऍड. ऋषिकेश इंडिस आदी असोसिएशनचे पदाधीकारी उपस्थित होते.