मुंबई : क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यावर राज्य सरकारकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर आता ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहेत.
राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लोकांमध्ये जनजागृती करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी तयारी दर्शवली आहे. याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला.
🕦 10.17am | 30-05-2023📍Mumbai | स. १०.१७वा. | ३०-०५-२०२३📍मुंबई
LIVE | भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर आणि स्वच्छ मुख अभियान, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार @sachin_rt https://t.co/3oVjMCMRX4— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 30, 2023
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे कार्य करणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी आज सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम पार पडला.