लाहोर : शोएब मलिकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा ५ विकेटनी पराभव करत विजय नोंदविला. यासह पाकिस्तानने तीन टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. शोएब मलिक सामन्याचा मानकरी ठरला.
Bangladesh lost the first T20I against Pakistan by 5 wickets.#BANvPAK pic.twitter.com/Z3ny8Vse7h
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 24, 2020
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना तमीम इकबालच्या ३९(३४), मुहमद नईमच्या ४३(४१), लिटन दासच्या १२(१३) आणि महमूदुल्लाहच्या नाबाद १९(१४) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १४१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून गोलंदाजीत शादाब खान, हारिस रौफ आणि शाहीन आफरींदी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
Bangladesh set a target of 142 in the first T20I.#BCB #BANvPAK pic.twitter.com/bhhwI51U5B
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 24, 2020
प्रत्युत्तरात विजयासाठीचे १४२ धावांचे आव्हान पाकिस्तानने १९.३ षटकांत ५ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. पाकिस्तानकडून फलंदाजीत शोएब मलिकने नाबाद ५८(४५), अहसन अलीने ३६(३२), मोहम्मद हफीजने १७(१६) आणि इफ्तिखार अहमदने १६(१३) धावांची खेळी केली.
Shoaib Malik stars in Pakistan's five-wicket victory over Bangladesh in the first T20I in Lahore.
The middle-order batsman made a brilliant 58* from 45 balls 👏#PAKvBAN SCORECARD: https://t.co/xFeYgDMPEq pic.twitter.com/QVPe92ObQw
— ICC (@ICC) January 24, 2020
बांगलादेशकडून गोलंदाजीत शफीउल इस्लामने २ तर मुस्ताफिजुर रहमान, अल-अमीन होसैन आणि अमीनुल इस्लामने प्रत्येकी १ गडी बाद केला.