बर्लिन – जर्मनीमधील केल या शहरांमध्ये एका व्यक्तीच्या घरात दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत वापरलेला एक रणगाडा आणि इतर हजारे सापडल्याने खळबळ माजली आहे या व्यक्तीला तब्बल दोन कोटी 22 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यावर आणखी काही कारवाई करता येईल का याबाबत विचार सुरू झाला आहे 2015 मध्ये हि घटना घडली होती.
या व्यक्तीच्या घरांमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधी मध्ये वापरण्यात आलेला पॅंथर टॅंक अँटी एअरक्राफ्ट गन आणि अन्य शस्त्रे सापडली होती देशातील प्रायव्हसी कायद्याप्रमाणे या व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात येत नसले तरी त्याच्यावर कारवाई मात्र सुरू झाली आहे त्याला तीन लाख डॉलर्स म्हणजेच दोन कोटी 22 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या वृद्ध व्यक्तीच्या वकिलाने केलेला बचाव याप्रमाणे ज्याच्या घरात सापडलेल्या या वास्तूचा कोणताही उपयोग नाही आणि या वस्तू घातक नाहीत केवळ भंगार वस्तू म्हणून रणगाडा आणि या वस्तू विकत घेतल्याचा दावाही या वकिलाने केला आहेपण हि सर्व शस्त्रे वापरणे योग्य असल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला आहे जर्मनीत वॉर वेपन्स कंट्रोल ऍक्ट नावाचा एक कायदा आहे.
या कायद्याचा या वृद्ध माणसाने भंग केला आहे की काय याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे या कायद्याप्रमाणे महायुद्धाच्या कालावधीमध्ये वापरण्यात आलेल्या वस्तूंची खरेदी आणि विक्री करण्यास बंदी आहे त्याने या कायद्याचा भंग केल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर आणखी कारवाई होऊ शकते.
दरम्यान जर्मनीमधील एका म्युझियमने या व्यक्तीच्या घरात सापडलेला या सर्व वस्तू खरेदी करून आपल्या संग्रहालयात ठेवण्याची तयारी दर्शवली आहे २०१५ च्या जुलै महिन्यामध्ये जेव्हा या वृद्ध व्यक्तीच्या घरावर छापा टाकण्यात आला तेव्हा त्याच्या बेसमेंट मधून हा रणगाडा बाहेर काढण्यासाठी 20 जवानांना तब्बल नऊ तास परिश्रम घ्यावे लागले होते एका स्थानिक नागरिकाने या रणगाड्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.