राजकुमार राव आणि जान्हवी कपूरला प्रेक्षकांनी सर्वप्रथम “रुही’मध्ये बघितले होते. प्रेक्षकांना या सिनेमाने खूप एन्टरटेन केले होते. मात्र विश्लेषकांनी या सिनेमाला फारसा चांगला प्रतिसाद दिलेला नव्हता.
पण राजकुमार राव आणि जान्हवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आता हे दोघे जण पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी सिनेमामध्ये हे दोघेजण क्रकेटपटू म्हणून दिसणार आहेत.
या सिनेमासाठी दोघेही क्रिकेटचे विशेष प्रशिक्षण घेणार आहेत. अर्थात त्यांच्या या क्रिकेटच्या स्टोरीचा प्रत्यक्षात काहीही संबंध नाही. ही एक काल्पनिक कथा असणार आहे. त्यामध्ये क्रिकेटपेक्षा इमोशन्सचा तडका असणार आहे.
जान्हवी कपूर सध्या “दोस्ताना 2’मध्ये व्यस्त आहे. यानंतर ती दक्षिणेकडील सुपरहिट “हेलन’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करणार आहे. जान्हवीला दक्षिणेकडील अनेक सिनेमांच्या ऑफर मिळाल्या आहेत. दुसरीकडे राजकुमार रावने “हम दो हमारे दो’चे शूटिंग पूर्ण केले आहे. आता तो “बधाई दो’चे शूटिंग करणार आहे. त्याच्याकडे देखील दक्षिणेतील अनेक सिनेमांच्या ऑफर आहेत.