पंढरपुर – गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. अश्यातच आज गौतमी पाटील संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असेलेल्या पंढरपुरातील विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल झाली. सध्या गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल असतात.
अश्यातच आपल्या व्यस्त कार्यक्रमातून ती आज पंढरपुरात दिसली. यावेळी तिने विठ्ठल-रुख्मिनीचे दर्शन घेतले. ‘श्री विठ्ठलाचा आशीर्वाद असाच राहावा…’ असे मागणी घातल्याचं तीनं सांगितलं. दर्शन झाल्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ती बोलत होती.
यावेळी गौतमीने आपल्या लग्नाबद्दल देखील सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी बीडच्या गलांडे पाटील याने सोशल मीडियावर चक्क गौतमी पाटील हिला लग्नाची मागणी घातली. तू जशी आहेत, तशी स्वीकारायला मी तयार असल्याचं गलांडे पाटील याने म्हटलं होतं. आणि आता याच प्रश्नाला स्वतः गौतमीने उत्तर दिलं आहे. ती म्हणली की, “सध्या तरी लग्नाचा विचार नाही. कोणीही काही बोललं तर कसं लक्ष देणार, असंही गौतमी पाटील हिने सांगितले.